श्री. साकळाई देवीचा सोमवारी यात्रोत्सव


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर - व श्रीगोंदा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कोरेगाव - चिखली येथील श्री. साकळाई देवीचा वार्षिक यात्रोत्सव सोमवारी (दि.१०) साजरा होत आहे. या निमित्त देवस्थानच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या यात्रोत्सवास शनिवार (दि.८ ) पासूनच सुरुवात होत आहे. सायंकाळी कोरेगाव येथे देवीचे गाडे मिरवणूक होणार आहे. नगरहून येणाऱ्या देवीच्या पालखीचे आगमन कोरेगाव येथे या वेळी होणार आहे. रात्री देवीचा जागर होणार आहे. सोमवारी (दि.१०) यात्रेचा मुख्य दिवस असून पहाटे ५ . ३० वाजता देवीचा अभिषेक, पुजा उत्सव. त्यानंतर ६ वाजता दर्शन सुरू होईल. दिवसभर भाविक दर्शन लाभ घेतील. संध्याकाळी ७ वाजता मानाची काठी, पालखी मिरवणूक सोबत लेझीम पथक, आराधी पथक मिरवणुकीने वाजत गाजत मंदिर प्रदक्षिणा घालतील. या यात्रेत विविध शेतीपूरक व्यवसाय, संसारोपयोगी दुकाने. खेळणी दुकाने, मिठाई दुकाने असणार आहेत. तरी सर्व साकळाई देवी भक्तांनी यात्रा उत्सवाचा शांततेत लाभ घ्यावा.असे आवाहन श्री. साकळाई देवस्थानचे विश्वस्त बाळासाहेब साबळे, दादासाहेब साबळे, रामदास कानडे, बाळासाहेब मोहारे यांच्यासह ग्रामस्थ मंडळाने केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post