शालेय पोषण आहारात कोट्यावधीचा घोटाळा!


जालींदर वाकचौरे : सुट्ट्याचा काळात दुध, अंडी, फळांसह तांदूळावर ताव कोणाचा?
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने राबविण्यात येणार्‍या शालेय पोषण आहार योजनेत एप्रिल ते मे 2019 या सुट्टट्याच्या कालावधीत कोट्यावधी रुपयांचा गफला झाला आहे. विशेष म्हणजे या दोन महिन्यांत प्राथमिक शाळांना सुट्या असतांना प्राथमिक शिक्षक विभागाने अंडी, दूध आणि फळांच्या पुरवठ्यापोटी 2 कोटी 52 लाख 44 हजारांचा निधी बंधीत पुरवठारला अदा केलेले, असल्याचा आरोप जिल्हा परिषदभाजप गटनेते जालींदर वाकचौरे यांनी केला आहे. यासह दर महिन्यांला नियमित पुरवठा होणार्‍या तांदूळाचे 2 कोटी 57 हजार रुपयांचे देयक शिक्षण विभागाने खात्री न करता परस्पर अदा केले असल्याने यात देखील मोठा आर्थिक गोंधळ असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती देतांना सदस्य जालिंदर वाकचौरे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातून घेतलेल्या माहितीनूसार जिल्ह्यात दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यांत प्राथमिक शाळांना सुट्या असते. याच काळात शिक्षण विभागाने पोषण आहार पुरवठा करणार्‍या संबंधीत ठेकेदारलाशी संगमत करून पोषण आहार योजनेतील विद्यार्थ्यांच्या आहारावर ताव मारण्याचे काम केलेले आहे. सरकारने उदात्त हेतून प्राथमिक शाळेत येणार्‍या 1 ली ते 5 वी आणि 6 वी ते 8 वीपर्यंत सरकारी आणि अनुदानीत शाळांमधील विद्यार्थ्यांना पूरक आणि पोषण आहार देण्याचा निर्णय घेतला. मात्र, योजना राबवितांना पुरवठादार आणि शिक्षण विभाग ताव मारल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यातील पोषण आहार योजनेसंदर्भात यापूर्वी अनेक वेळा तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे जालींदर वाकचौरे यांनी सांगितले. एप्रिल ते मे 2019 या सुट्टट्याच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या शाळांना सुट्ट्या असतांना शिक्षण विभागाने या काळात पुरवठा केलेल्या केळी, अंडी आणि फळांच्या बिलापोटील 2 कोटी 52 लाख 44 हजार रुपये संबंधीत ठेकेदाराला अदा केलेले आहेत. यासह जून ते सप्टेंबर 2019 दरम्यान तांदूळाच्या पुरवठापोटी संबंधीत पुरवठादार याच्या घशात 2 कोटी 57 लाख 94 हजार रुपयांची रक्कम घातली आहे. ही रक्कम अदा करतांना संबंधीत पुरवठादार यांने पाठविलेला तांदूळ, त्याचा दर्जा, त्याचे वजन यांची खातजमा शिक्षण विभागाने केली नाही, याचा तपशील मात्र मिळत नाही. यामुळे अदा करण्यात आलेली रक्कमेबाबत संशयाचेकडे तयार झालेले आहे.

यापूर्वी जिल्ह्यात पोषण आहाराबाबत अनेकवेळा तक्रारी झालेला आहेत. मात्र, शिक्षण विभागाने पोषण आहार योजना आणि संबंधीत पुरवठादार यांच्यावर केलेल्या मोठ्या कारवाईची माहिती कोणाच्या ऐकिवात नाही. जर संबंधीत विभागच पुरवठादार याला अभय देत असले तर दोषी कोणाला धराचे असा प्रश्‍न सदस्य वाकचौरे यांनी उपस्थित केला आहे.




प्रतिनिधीक स्वरूपातील तांदूळाचे देयक

जून 2019 मध्ये 4 लाख 32 हजार 409 लाभार्थ्यांचे 21 लाख 62 हजार 45 रुपये, जुलै 2019 मध्ये 21 लाख 87 हजार 373 लाभार्थ्यांचे 1 कोटी 9 लाख 36 हजार रुपये, ऑगस्ट 2019 मध्ये 1 लाख 71 हजार 4 हजार लाभार्थ्यांचे 85 लाख 70 हजार 195 रुपये, सप्टेंबर 2019 मध्ये 8 लाख 25 हजार 174 लाभार्थी 41 लाख 25 हजार 870 रुपये असे आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post