निर्भया प्रकरणातील आरोपींना २२ जानेवारीला फाशी नाही…!


माय अहमदनगर वेब टीम|
नवी दिल्ली: निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींची फाशीची शिक्षा आणखी काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. दोषींना २२ जानेवारी रोजी फाशी होणार नाही. कारण, या प्रकरणातील चार आरोपींपैकी एक असलेल्या मुकेश याने कनिष्ठ न्यायालयाकडून सुनावण्याता आलेल्या डेथ वॉरंटला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे, ज्यावर आज न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आरोपीच्या वकिलाने न्यायालयात युक्तीवाद केला आहे की, राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर देखील त्याला १४ दिवसांचा वेळ मिळतो, यामुळे डेथ वॉरंट रद्द करावे.

दरम्यान निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या दोषींची क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. विनय शर्मा आणि मुकेश या दोघांनी ही याचिका दाखल केली होती. न्या. आर भानुमती आणि अशोक भूषण यांच्या ५ न्यायाधीशांच्या पिठाने ही याचिका फेटाळली होती.

दिल्लीतील निर्भया बलत्कार प्रकरणी चारही दोषींना २२ जानेवारी रोजी फाशी देण्यात येणार आहे. ७ जानेवारी रोजी दिल्ली न्यायालयाने हा निर्णय देत डेथ वॉरंट जारी केलं होतं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post