डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची उंची वाढवणार - उपमुख्यमंत्री अजित पवार


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- दादर येथील इंदू मिलच्या जागेवर होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची उंची वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून आता हा पुतळा 350 फुटांचा असणार आहे तर स्मारकाची उंची 450 फूट असेल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याच्या सुधारित प्रस्तावाला बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पुतळ्याची उंची वाढणार असल्याने आता या स्मारकाच्या खर्चातही वाढ होणार आहे. आधी स्मारकासाठी 709 कोटी रुपये प्रस्तावित खर्च होता आता तो 990 कोटींवर जाणार आहे. परंतु बाबासाहेबांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही अजित पवारांनी यावेळी दिली.

या स्मारकाचे काम दोन वर्षांत पूर्ण करणार असल्याच्या आपल्या घोषणेचा त्यांनी पुनरुच्चार केला. राज्य सरकारच्या सर्व परवानग्या या प्रत्येक विभागाच्या सचिवांनी 8 दिवसांत पूर्ण करायच्या आहेत, असे आदेशही दिले असल्याचे अजित पवारांनी सांगितले.येत्या 21 जानेवारीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब इंदू मिलला भेट देणार असल्याचेही अजित पवारांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post