उन्नाव प्रकरण / बलात्कार प्रकरणात जामीनावर सुटलेल्या आरोपींनी पीडितेला जीवंत पेटवले, तिघांना अटक, दोघे फरार
माय अहमदनगर वेब टीम
लखनऊ - उत्तर प्रदेशील उन्नाव येथे जामीनावर बाहेर आलेल्याबलात्कार प्रकरणातील 2 आरोपींनी गुरुवारी सकाळच्या सुमारास पीडितेला जीवंतपेटवले. पोलिसांनी गंभीर अवस्थेत भाजलेल्या पीडितेला रुग्णालयात दाखल केले. तेथून डॉक्टरांनी लखनऊच्या ट्रामा सेंटरला हलवण्यास सांगितले.या प्रकरणातील मुख्य आरोपी शुभमने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने पीडितेला पेटवले. शुभम आणि त्याच्या वडिलांनी अटक केली आहे. तर इतर तिघे फरार झाले आहेत.
कोर्टात जात असताना केले कृत्य
पोलिसांनुसार, हिंदूनगर पोलिस ठाणे परिसरातील ही घटना आहे. गुरुवारी सकाळी बलात्कारप्रकरणी सुनावणीसाठी पीडिता रायबरेली कोर्टात जात होती. रेल्वे पकडण्यासाठी पायी जात असताना दबा धरून बसलेले दोन मुख्य आरोपी शुभम आणि शिवम त्रिवेदी आणि त्यांचे तीन साथीदारांनी पीडितेला घेरले. यानंतर तिच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिले.
युवतीने पोलिसांना दिलेल्या जबाबात आरोपींची नावे सांगितली
एस पी विक्रांत यांनी सांगितले की, पीडिता 90% भाजली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. युवतीने आपल्या जबाबात आरोपींची नावे सांगितली. यावरून पोलिसांनी आरोपी शुभम त्रिवेदी आणि त्याचे वडील हरिशंकर त्रिवेदी यांनी अटक केली आहे. तर तिघे आरोपी फरार आहेत. त्यांचा तपास सुरु आहे. दरम्यान शुभम आणि शिवम बलात्कार प्रकरणात दोन दिवसांपूर्वी जामीवर तुरुंगातून बाहेर आले होते. रायबरेली कोर्टाच्या आदेशावरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलंाा होता.
Post a Comment