नीरव मोदी अखेर फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित




माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी हिरा व्यावसायिक नीरव मोदीला फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले आहे. ईडीने मुंबईच्या विशेष PMLA कोर्टात दाखल केलेला अर्ज स्वीकारला आहे. नीरव मोदी सध्या लंडनमध्ये असून सुमारे 13,000 कोटींच्या पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यात ते फरार आहेत. एफईओ कायद्यानुसार आर्थिक गुन्हेगार घोषित झाल्यानंतर त्याच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी कारवाई केली जाऊ शकते.

नीरव मोदीवर13 हजार 500 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. ईडी आणि सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहेत.दरम्यान नीरव मोदी यांना 19 मार्च रोजी होलबॉर्न येथून अटक करण्यात आली होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post