महाराष्ट्रात येत्या तीन दिवसांत गारपिटीची शक्यता ?


माय अहमदनगर वेेेब टीम
मुंबई - महाराष्ट्रात येत्या तीन दिवसांमध्ये गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभाग (आयएमडी)ने गुरुवारी हा अंदाज व्यक्त केला. डिसेंबर महिना आला तरीही राज्यात थंडीचे वातावरण दिसत नाही. त्यातच मुंबईमध्ये गुरुवारी सकाळी पाउस पडला. अशात हवामान विभागाचा अंदाज खरा ठरल्यास राज्यात थंडीची लाट अचानक वाढू शकते. तत्पूर्वी पुण्यातील वेधशाळेने सुद्धा राज्यात पावसाची शक्यता व्यक्त केली होती.

लांबलेला पावसाळा, ऋतुचक्राचे बदललेले वेळापत्रक, गायब झालेली थंडी.. यांचा मागोवा घेत राज्याच्या पश्चिमेकडील अरबी समुद्रात एकाच वेळी दोन चक्रीवादळांची निर्मिती होत आहे. अरबी समुद्राच्या नैऋत्य भागात कमी दाबाची अतितीव्र क्षमतेची दोन क्षेत्रे एकाच वेळी निर्माण झाली आहेत. कमी दाबाचे हे भोवऱ्यासारखे क्षेत्र अजून राज्याच्या पश्चिम किनाऱ्यापासून बरेच दूर असले, तरी आगामी 12 ते 48 तासांत, त्यांचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची दाट शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. असे घडून आल्यास 2019 हे वर्ष चक्रीवादळ वर्ष म्हणूनच ओळखले जाईल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post