राष्‍ट्रीय एडस नियंत्रण कार्यक्रमाच्‍या प्रभावी अंमलबजावणीमुळे शुन्‍याकडे वाटचाल



माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एडस दिन म्‍हणून पाळला जातो. या अनुषंगाने महाराष्‍ट्र राज्‍य एडस्‍ नियंत्रण संस्‍थेच्‍यावतीने जिल्‍हयात विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे. या वर्षीचे ब्रीद वाक्य "Know your status" हे असून एड्स निर्मुलनाकरिता समाज बदल घडवू शकतो (Community makes the difference) ही संकल्पना राबविली जाणार आहे.

जिल्‍हयात एच.आय.व्‍ही समुपदेशन व चाचणी करण्‍यासाठी आयसीटीसी केंद्र कार्यरत आहेत. ज्‍या ठिकाणी प्रशिक्षित समुपदेशक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ कार्यरत असून या केंद्रामार्फत एचआयव्‍ही समुपदेशन विशेषत व्‍यक्‍तीच्‍या वर्तणामध्‍ये बदल घडून आणण्‍यासाठी कार्य केले जाते. त्‍याचप्रमाणे जे एचआयव्‍ही संसर्गित आढळले आहेत त्‍यांना पुढील सेवा उपलब्‍ध करुन देण्‍यात येतात. आयसीटीसी केंद्रामार्फत परिसरातील वेगवेगळया गटांमध्‍ये एचआयव्‍ही जनजागृती होण्‍याच्‍या दृष्‍टीने विविध कार्यक्रम आयेाजित केले जातात. जिल्‍हयामध्‍ये सामान्‍य रुग्‍णालयामध्‍ये एचआयव्‍ही बाधीतांचे प्रमाण 31 टक्‍केवरुन 0.5 टक्‍केपर्यत आले असून जिल्‍हयातील केंद्राच्‍या प्रभावी कामामुळे एचआयव्‍हीचे प्रमाण दिवसेदिवस कमी होत असल्‍याचे आढळून आले आहे.

जिल्हयात राष्‍ट्रीय एडस नियंत्रण कार्यक्रमांतर्गत येणा-या नवीन पिढीमध्‍ये एचआयव्‍हीचा संसर्ग जाऊ होऊ नये म्‍हणून पीपीटीसीटी प्रकल्‍प राबविण्‍यात येत आहे. या अंतर्गत प्रत्‍येक गरोदर मातांची तपासणी करुन संसर्गिक माता व नवजात बालकांस आवश्‍यक उपचार दिले जातात. ज्‍यामुळे संसर्ग जाण्‍याचे प्रमाण हे 10 टक्‍क्‍यांवर येत होते. मागील तीन वर्षापासून उपचार पध्‍दतीत बदल होवून नवीन पीपीटीसीटी एम डी आर पध्‍दतीचे प्रभावी अंमलबजावणी केल्‍यामुळे हे प्रमाण 2 ते 5 टक्‍यांपर्यत आणण्‍यास मदत होत आहे. जिल्ह्यामध्ये नोंदणी झालेल्या गरोदर स्त्रियांमध्ये शेकडा 5.2 हा दर आजपर्यंत 0.1 टक्के एवढ्यापर्यंत आलेला आहे हे या कार्यक्रमाचे यशच म्हणावे लागेल.

तसेच जिल्ह्यामध्ये 636 बालके एच.आय.व्ही. तपासणी केली असता 566 बालके निगेटीव्‍ह तर 70 बालके पॉजीटीव्‍ह अढळून आलेली आहेत. ज्‍यांना त्‍वचा व गुप्‍तरोग आहे त्‍यांना एचआयव्‍ही होण्‍याची जोखीम अधिक असते या केद्रात येणा-या रुग्‍णांना एचआयव्‍ही बाबतची माहिती देवून त्‍वचा व गुप्‍तरोगाच्‍या उपचार दिल्‍यामुळे एचआयव्‍ही होण्‍याचा धोका कमी केला जातो. यासाठी जिल्‍हयात त्‍वचा व गुप्‍तरोग केंद्र कार्यरत आहेत.
एड्स नियंत्रण कार्यक्रमाची सद्यस्थिती पाहता, जिल्हयामध्ये आय.सी.टी.सी. केंद्र जिल्‍हा रुग्‍णालय, अहमदनगर व प्रवरा मेडिकल ट्रस्‍ट लोणी असे दोन कार्यरत असून या ठिकाणी मोफत समुपदेशन व चाचणी केली जाते. समुपदेशनाद्वारे त्‍यांची शाररीक स्थिती चांगली राहण्‍यासाठी काळजी घेतली जाते. माहे ऑक्‍टोबर 2019 अखेर एकूण 22 हजार 930 रुग्‍ण दाखल झालेले असून त्‍यापैकी 18 हजार 18 रुग्‍णांना उपचार सुरु आहे. त्‍यातील 10 हजार 336 रुग्‍ण हे प्रत्‍यक्ष उपचार घेत आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या नवीन ध्येयानुसार 90:90:90 हा कार्यक्रम सध्या राबविला जात असून, या नुसार 90 टक्के एच.आय.व्ही. संसर्गितांना स्वत: च्या स्थितीची कल्पना असणे तसेच यापैकी 90 टक्के लोकांना पुढील उपचार व सुविधांकरिता संदर्भित करणे व पैकी 90 टक्के लोकांचा एच.आय.व्ही. विषाणूभार नियंत्रणात आणून त्यांचे आर्यूमान वाढले पाहीजे हे उद्दीष्ट आहे. सध्या हा कार्यक्रम डोळ्यासमोर ठेवून एड्स नियंत्रणाचे काम सुरु झालेले असून सर्व यंत्रणा कार्यरत आहे असे कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव यांनी कळविले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post