आरोग्यदायी तक्रधारा
माय अहमदनगर वेेेब टीम
हेल्थ डेस्क - शिराधारा’ या चिकित्सेबद्दल आपण यापूर्वी बरेच ऐकले, वाचले असणार. ‘धाराकल्प’ ही केरळची परंपरागत चिकित्सा पद्धतीची विशेष देण आहे. अंगावर विविध औषधी धार धरणे याला ‘धाराकल्प’ म्हणतात. यामध्ये औषधीसिद्ध तेल, दूध, ताक, धान्याम्ल यांचा विशेष समावेश आहे. या धारा संबंध शरीरावर तसेच डोके आदि एक अवयवावरसुद्धा धरल्या जातात. सर्वांग धारा, शिरोधारा असे त्याचे नाव.
सर्वांगधारेसाठी ‘द्रोणी’ नावाचे विशेष पात्र अपेक्षित आहे. जेव्हा ही धार अंगावर धरली जाते ते द्रव्य पुन्हा जमा करून परत अंगावर धार धरली जाते. ही क्रिया दररोज एक तास याप्रमाणे सात ते एकवीस दिवस केली जाते. शिरोधारेसाठीसुद्धा अशीच सुविधा आवश्यक आहे.
तक्रधारा
एक वर्ष जुना, सुकलेला आवळा, त्यातील बीया काढून त्याचा काढा केला जातो. रात्री दुधामध्ये नागरमोथा टाकून दूध विरजन लावले जाते. सकाळी या दह्याचे ताक करून गाळून त्यात आवळ्याचा काढा एकत्र केला जातो. हे मिश्रण तक्रधारेसाठी वापरले जाते. डोक्याला तेल लावून, डोळ्यावर पट्टी बांधून ही धार डोक्यावर न पडता ‘धाराचट्टी’ द्वारा टाकली जाते. (सुताचा गुच्छ) तक्रधारा संपल्यानंतर रास्नादिचूर्णाचे तळम करून धूर केला जातो. ज्यामुळे या क्रियेनंतर सर्दी, ताप वगैरे काही अडचण निर्माण होत नाही.
उपयोग
एक मतिमंद रुग्णावर अशा प्रकारची उपाययोजना केल्यानंतर तो खूप सुधारणा दाखवतोय. त्याची लाळ गळणे, सर्दी, अनिद्रा या तक्रारी बंद झाल्या. या व्यतिरिक्त बीपीमध्ये सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो. कारण या क्रियेमुळे शरीरामध्ये असलेला अकारण थकवा, मानसिक ताण, चिडचिड, उष्णता, गर्मी कमी होऊन मन शांत होते. केस अकाली पांढरे होणे, डोकेदुखी, सांध्यामध्ये शैथिल्य, कान, डोळ्याचे विकारांमध्ये सुद्धा उपयुक्त. झीेीळरीळी या त्वचेच्या आजारामध्ये या तक्रधारेचा उपयोग शास्त्रीयदृष्ट्या, केरळमध्ये सिद्ध झालेला आहे. या क्रियेमुळे वाचा, मन, शरीर, बल, धैर्य स्थिर होऊन आवाजामध्ये गोडवा, त्वचा मृदू, नेत्रविमल, शुक्रपुष्टी तसेच दीर्घायुष्य लाभते. उष्णता कमी होऊन दु:स्वप्न दूर होतात. गाढ झोप लागते.
उपरोक्त रुग्णांनी तर याचा लाभ घ्यावाच. शिवाय संस्थांनी उन्हाळ्यात एकदा करून बघायला हरकत नाही.
Post a Comment