ठाकरे सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव, भाजपचा जोरदार राड्यानंतर सभत्याग





माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- महाराष्ट्राचे नवनिर्नाचीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणी आज पार पडली. विधानसभेत काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या बाजूने 169 मत पडली, तर 4 जण तटस्ट होते. यावेळी भाजपने नियमबाह्य अधिवेशन बोलवल्याचा आरोप करत, सभात्याग केला.


विधानसभेत अधिवेशनाला आणि बहुमत चाचणीला उपस्थित राहण्यासाठी सर्व पक्षांनी आपाल्या आमदारांना व्हीप जारी केला होता. विधानसभेचे कामकाज दुपारी 2 वाजता सुरू झाले. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सरकारच्या कामकाजावर बोट ठेवले. यावेळी त्यांनी अधिवेशन नियमबाह्य असल्याचे सांगितले.

"हे अधिवेशन नियमबाह्य असून, 27 नोव्हेंबरला राष्ट्रगीत झाले म्हणजे अधिवेशन संस्थगित झाले. अधिवेशन पुन्हा बोलावण्यासाठी राज्यपालांच्या समन्सची गरज असते, असे झाले नाही." असे मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. तसेच नव्या अधिवेशनाची सुरुवात वंदे मातरम ने व्हायला हवी होती. असेही ते म्हणाले. याववर उत्तर देताना विधानसभा हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील म्हणाले की, राज्यपालांच्या समन्सनेच हे अधिवेशन बोलावले आहे. हे अधिवेशन पूर्णपणे कायदेशीर आहे, तुमचा मुद्दा मी फेटाळून लावतो. तसेच, पुढे बोलताना ते म्हणाले की, सात दिवसाच्या आत सभागृह बोलवता येते. शपथविधी झाल्यानंतर बैठक झाली त्यानंतर काल राज्यपालांनी परवानगी दिली. त्यामुळे हे अधिवेशन कायदेशीर आहे. तुमचा मुद्दा फेटाळून लावतो. अशा पध्दतीने दिलीप वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post