शपथविधीनंतर उद्धव ठाकरेंनी घेतला राज ठाकरेंच्या आईंचा आशीर्वाद, कुंदाताई ठाकरेंना अश्रु अनावर
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- आज ऐतिहासिक क्षण महाराष्ट्रातील जनतेला अनुभवायला मिळाला. नेहमी पडद्यामागून राज्य चालवणाऱ्या ठाकरे घराण्यातील पहिला व्यक्ती एकही निवडणूक न लढवता थेट मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाला. शिवसेना पक्षप्रमुखे उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी हजारो शिवसैनिक मुंबईतील शिवतीर्थावर उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्याला ठाकरे कुटुंबाचा भावनिक क्षणही लोकांना पाहण्यास मिळाला. उद्धव ठाकरेंचे बंधू राज ठाकरे यांच्या आई कुंदाताई शपथविधीला उपस्थित होत्या. उद्धव ठाकरेंनी त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यावेळी कुंदाताईंना अश्रु अनावर झाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला संपूर्ण ठाकरे कुटुंब हजर होते. ठाकरे घराण्यासाठी आजचा दिवस हा अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचा असाच होता. उद्धव यांनी शपथ घेतल्यानंतर सर्व दिग्गज मान्यवरांनी त्यांचं व्यासपीठावर अभिनंदन केलं. यावेळी राज यांनी हस्तांदोलन करून उद्धव यांचे अभिनंदन केले. त्यानंतर राज यांच्या आई कुंदाताई ठाकरे जेव्हा उद्धव यांना भेटल्या तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले. उद्धव ठाकरेही यावेळी भावूक झाले होते. अत्यंत भावनिक असा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला.
Post a Comment