गुलाबी चेंडूला लालच्या तुलनेत सर्वाधिक पेंट, त्यामुळे चेंडूला अधिक चमक, स्विंगची गती वेगवान
माय नगर वेब टीम
नवी दिल्ली - भारत आणि बांगलादेश यांच्यात २२ नोव्हेंबरपासून कोलकाता येथे दिवस-रात्र कसोटी खेळवली जाईल. ही दोन्ही देशातील पहिली दिवस-रात्र कसोटी असेल. कसोटी लाल चेंडूवर खेळवण्यात येते. मात्र, दिवस-रात्र कसोटीत लाल चेंडू स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे गुलाबी चेंडूचा प्रयोग केला जाईल. गुलाबी चेंडूवर लाल चेंडूपेक्षा अधिक रंग वापरण्यात आला आहे. कारण चेंडू लवकर खराब होऊ नये यासाठी. त्यामुळे चेंडूवर अधिक चमक देखील असते. चमक अधिक असल्याने वेगवान गोलंदाजांना स्विंग देखील चांगले मिळेल.
सामन्याला दुपारी १ वाजता सुरुवात होईल. म्हणजे सामन्यात दोन्ही वेळेला फ्लड लाइटचा वापर होईल. कसोटीत एका चेंडूवर ८० षटकांचा खेळ होतो. लाल चेंडू फ्लड लाइटमध्ये स्पष्ट दिसत नाही, दुसरीकडे वनडेत वापरला जाणारा पांढरा चेंडू लवकर खराब होतो. त्यामुळे ९ वर्षे संशोधन केल्यानंतर दिवस-रात्र कसोटीसाठी गुलाबी चेंडू सर्वाधिक उपयुक्त ठरला. आतापर्यंत एकूण ८ देशांत ११ कसोटी दिवस-रात्र खेळवण्यात आल. सर्वाधिक पाच सामने ऑस्ट्रेलियात, दोन सामने संयुक्त अरब अमिरातमध्ये झाले. त्यासह इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडीज यांच्यात एक-एक लढत झाली.
Post a Comment