अहमदनगर - राहता येथे सोनसाखळी चोरांचा पाठलाग करतांना संशयितांनी पोलिसांवर गोळीबार केल्याने एक पोलीस जखमी झाला आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. यातील एका संशयितास पकडण्यास पोलिसांना यश आले आहे.
दरम्यान शहरात चॅन स्नॅचिंगचे प्रमाण वाढले असून या सोनसाखळी चोरांवर पोलिसांची करडी नजर आहे. आज सकाळच्या सुमारास चैनस्नॅचिंग करून पळणाऱ्या चोरांचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांवरच या चोरटयांनी गोळीबार केल्याची घटना घडली. या गोळीबारात पोलिस कॉन्स्टेबल अजित पठारे गंभीर जखमी झाले असून त्यांना शिर्डी येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. यातील एका संशयितास जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. सचिन ताठे असे त्याचे नाव असून तो श्रीरामपूर येथील असल्याचे समजते.
विभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे तात्काळ घटनास्थळी झाले असून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ही घटना घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
Post a Comment