शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची बंद दाराआड ‘गुफ्तगू’ ; राजकीय चर्चांना उधाण



माय नगर वेब टीम
मुंबई - महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथ दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. शेतकर्‍यांच्या प्रश्नावर पवार पंतप्रधानांशी भेट घेणार असले तरी ते राज्यातील सरकार स्थापनेच्या संबंधित चर्चा करणार असल्याचेही दिसून येत आहे.

दोन दिवसापूर्वीच पंतप्रधानांनी राज्यसभेत राष्ट्रवादीचे कौतुक करून सर्वांना चकित केले होते. दरम्यान यावर शिवसेनेने ही बैठक सामान्य असल्याचे जाहीर केले आहे.

दरम्यान निकाल लागून महिना होत आला तरी अद्याप सत्ता स्थापनेचे कोडे उलगडले नाही. त्यामुळे राज्यातील राजकारण दिवसेंदिवस बदलत असल्याचे चित्रही दिसत आहे. दरम्यान शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची भेट दुपारी होत असून यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामान्य चर्चा असल्याचे सांगितले आहे.

ते म्हणाले कि, पवार साहेब शेतकरी नेते असून ते पंतप्रधानांना भेटून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात चर्चा करून राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी ते करतील. तसेच ‘ गुरुवारी महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आघाडीचे सरकार स्थापन होईल, असा दावा त्यांनी यावेळी केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post