दहावी व बारावी परीक्षेस अर्ज करण्यास मुदतवाढ, विद्यार्थ्यांना आता नियमित शुल्कासह 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येईल
माय नगर वेब टीम
औरंगाबाद-माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी व मार्च 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून विहित मुदतीत वाढ देण्यात आली. दहावीच्या विद्यार्थ्यांना आता नियमित शुल्कासह 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येईल तर बारावीच्या विद्यार्थ्यांना 25 नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज करण्यास अंतिम मुदत असणार आहे.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या नियमित, पुर्नपरीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन पद्धतीने आवेदनपत्र सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दहावीसाठी नियमित शुल्कासह 15 आॅक्टोबर ते 20नोव्हेंबर या कालावधीत अर्ज करण्यासाठी विहित मुदत देण्यात आली होती. तर विलंब शुल्कासह 21 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत अर्ज करण्याची मुदत होती. यात वाढ करण्यात आली असून आता नियमित शुल्कासह 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावा लागेल. तर विलंब शुल्कासह 10 डिसेंबरपर्यंत मुदत आहे. बारावीसाठी नियमित शुल्कासह 3आॅक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत अर्ज करण्यासाठी विहित मुदत देण्यात आली होती. तर विलंब शुल्कासह 16ते 25 नोव्हेंबर या कालावधीत अर्ज करण्याची मुदत होती. यात वाढ करण्यात आली असून आता नियमित शुल्कासह 25 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावा लागेल. तर विलंब शुल्कासह 5 डिसेंबरपर्यंत मुदत आहे.
Post a Comment