केंद्र सरकार वर्षभरात 1 लाखाहून अधिक रिक्त पदे भरणार



माय नगर वेब टीम
नवी दिल्ली – येत्या वर्षभरात केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये 1 लाखाहून अधिक रिक्त पदांवर भरती होणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत सांगितले आहे.

केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये 1 मार्च 2018 पर्यंत जवळपास 7 लाख जागा रिक्त असल्याचेही त्यांनी सांगितले. गुरुवारी जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत सरकारच्या विविध विभागांमध्ये रिक्त असलेल्या जागांसदर्भात माहिती दिली. यावेळी तृतीय श्रेणीत 5,74,289 पदे रिक्त आहेत. द्वितीय श्रेणीत 89,638 पदे आणि प्रथम श्रेणीत 19,896 पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांची एकूण संख्या 6,88,823 इतकी आहे तसेच, 2019-20 मध्ये कर्मचारी निवड आयोग 1,05,338 केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये अधिकारी आणि कर्मचार्‍यांची रिक्त पदे भरण्याच्या तयारीत असल्याचे ते म्हणाले.

लवकरात लवकर भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 1 जानेवारी 2016 पासून अनेक जागांसाठी मुलाखती बंद केल्या आहेत. जास्तकरून टेस्ट ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहेत. तसेच, एससी, एसटी आणि ओबीसींसाठी आरक्षित बॅकलॉग जागांची मोठी संख्या आहे, असेही जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post