राज्यस्तर स्केटिंग रोलर हॉकी स्पर्धेसाठी कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल संघांची निवड
माय नगर वेब टीम
अहमदनगर -
राज्यस्तर स्केटिंग रोलर हॉकी स्पर्धेसाठी केडगाव भूषण नगर येथील कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल संघांची निवड झाली आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, क्रीडा व युवा सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी पुणे येथे शालेय विभागस्तर स्पर्धा घेण्यात आल्या. सदर स्पर्धेत पुणे विभागातील उत्कृष्ट संघांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत कार्मल कॉन्व्हेंट हायस्कूलने अंतिम सामन्यात पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण येथील संघांवर रोमहर्षक विजय मिळवत स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. या संघांची शालेय राज्य स्तर साठी निवड झाली. पुढिल राज्यस्तर स्पर्धा या दिनांक २७ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर दरम्यान खोपोली, रायगड येथे होणार आहेत.
निवड झालेल विदयार्थी यश अरुण कवाष्टे, नितेश सुभाषचंद्र कनोजिया, तेजस कमलेश गुंदेचा, समृद्ध दीपक आरडे, वेदांत भगवान बोडखे, अथर्व समीर कुलकर्णी, पार्थ राजेश गाडेकर, अथर्व राजेश राऊत, ललित रणजीत छजलानी, सुरज विरकर , राहुल भाऊ गांडाळ खेळाडूंची शालेय राज्य स्तरावर निवड झाली.
सदर विजयी खेळाडूंना विस्तार अधिकारी जयश्री कार्ले तसेच शाळेचा व्यवस्थापिका सिस्टर निर्मल मेरी, प्राचार्या सिस्टर सारुपिया, उपप्राचार्या सिस्टर दिव्या यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच सदर सर्व खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सतीश गायकवाड यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले.
Post a Comment