माय नगर वेब टीम
अहमदनगर - पत्रकारांचे स्वातंत्र्य अबाधित रहावे व त्यांच्यावर वारंवार होणारे हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात पत्रकार संरक्षण कायदा लागू करण्यात आलेला आहे. त्यासंबंधीचे नोटिफिकेशन निघाले असून, ते महाराष्ट्र सरकारच्या राजपत्रात प्रसिध्द झाले आहे. त्याची प्रत मराठी पत्रकार परिषद व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक सागर नेताजी पाटील यांना देण्यात आली. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख व ज्येष्ठ महिला पत्रकार मिनाताई मुनोत उपस्थित होत्या.
महाराष्ट्रात अनेक पत्रकारांवर जीवघेणे हल्ले झाले आहेत. तर अनेक पत्रकारांना आपला जीव गमवावा लागला आहे. पत्रकारांवर होणारे हल्ले थांबून त्यांना संरक्षण प्राप्त होण्यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती व मराठी पत्रकार परिषदेने सर्व पत्रकारांच्या माध्यमातून दिर्घकालीन लढा दिला. एस.एम. देशमुख व त्यांच्या सहकार्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारपुढे या कायद्याची मागणी लावून धरण्यात आली. त्याला यश येऊन दि.8 नोव्हेंबर रोजी त्यासंबंधीचे नोटिफिकेशन निघून, ते राजपत्रात प्रसिध्द झाले आहेत. पत्रकारांची एकजूट व लढ्याला यश आले असून, या कायद्याने पत्रकारांना एकप्रकारे संरक्षण मिळाले आहे. तर पत्रकारांवर हल्ले करणार्यांना वचक बसणार असल्याचे मन्सूर शेख यांनी सांगितले. या काद्याने पत्रकारांना सुरक्षितता मिळाली असून, त्यांना सन्मानाने जगता येणार असल्याची भावना मिनाताई मुनोत यांनी व्यक्त केली. पत्रकार संरक्षण कायद्याची राजपत्रात प्रसिध्द झालेली प्रत अप्पर पोलीस अधीक्षकांकडे सुपुर्द करुन जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला या प्रती पाठवून त्याची अंमलबजावणी करण्याची विनंती करण्यात आली. पत्रकार संरक्षण कायद्यान्वये पत्रकारांवर हल्ला करणारा व्यक्ती व अशा कृतीस चिथावणी देणार्या विरोधातील अपराधी व्यक्तीस 3 वर्ष कारावास किंवा 50 हजार रुपया पर्यंन्त दंडाच्या शिक्षेची तरतुद करण्यात आलेली आहे. सदरील अपराध हा दखलपात्र व अजामीनपात्र ठरुन त्याची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाडे सुनावणे होणार आहे.

Post a Comment