हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांची हिवरेबाजारला भेट ; गावातील पाणी, पिक नियोजन व पाण्याचा ताळेबंद जाणून घेतला
माय नगर वेब टीम
अहमदनगर - भिंगार येथील हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी नगर तालुक्यातील आदर्श गाव हिवरेबाजारला भेट देऊन गावाच्या सर्वांगीन विकासाची माहिती घेतली. तर गावातील पाणी, पिक नियोजन व पाण्याचा ताळेबंद जाणून घेतला.
आदर्श गाव योजना समितीचे कार्याध्यक्ष पोपट पवार यांनी गावात ग्रुपच्या सदस्यांचे स्वागत करुन गावात राबविण्यात आलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. यावेळी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सुधाकर चिदंबर, रमेश वराडे, दिलीप ठोकळ मेजर, अशोक लोंढे, सचिन कस्तुरे, नामदेवराव जावळे, रामनाथ गजे, किरण फुलारी, अशोकराव बोंदर्डे, सुंदरराव पाटील, सुभाषशेठ नाबरिया, मच्छिंद्र भांड बाबूजी, राकेश वाडेकर, शंकर भोजल, सुभाष गोंधळे, गोरखनाथ वामन, राजू काळे, सुभाष पेंडुरकर, विठ्ठलराव राहिंज, रमेशराव कडूस, एकनाथ जगताप, विनोद खोत मेजर, सुमित केदारे, संपतराव बेरड, तात्यासाहेब बेरड, मच्छिंद्र बेरड, जालिंदर अळकुटे, बापूसाहेब निमसे, संदिप सोनवणे आदी उपस्थित होते.
भिंगार येथील भगवान गौतमबुध्द जॉगिंग पार्क येथे व्यायामासाठी एकत्र आलेल्या नागरिकांनी हरदिन मॉर्निंग ग्रुपची स्थापना केली आहे. ग्रुपच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. वृक्षरोपणासह पर्यावरण संवर्धनासाठी ग्रुपने पुढाकार घेतला असून, त्यांनी जॉगिंग पार्क भोवती वनराई देखील फुलवली आहे. नुकतेच ग्रुपच्या सदस्यांनी हिवरेबाजारला भेट देऊन गावाच्या विकासात्मक कार्याची माहिती जाणून घेतली. सुधाकर चिदंबर यांनी नेत्रदानासह देहदानाचा संकल्प केल्याबद्दल त्यांचा पोपट पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हिवरे बाजारने प्रतिकुल परिस्थितीचा सामना करीत गाव जलसमृध्द करुन विकास साधला आहे. जल हेच जीवन असून या संपत्तीचा योग्य वापर केल्यास विकासात्मक बदल घडणार असल्याची भावना संजय सपकाळ यांनी व्यक्त केली. ग्रुपच्या सदस्यांनी हिवरेबाजार मध्ये जलसंधारण, मृदासंधारण, वनीकरण बरोबर स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार घेण्यात आलेल्या पिकांची पहाणी करुन सदरील कार्याचे व गावातील एकजुटीचे कौतुक केले. तसेच ग्रुपच्या सदस्यांनी टाकळी ढोकेश्वर येथील पुरातन मंदिर, पळशी येथील प्रतिपंढरपूर, मांडओहोळ धरण, कोरठण खंडोबा, दर्याबाईची वाडी आदी पारनेर तालुक्यातील विविध स्थळांना भेटी दिल्या.
Post a Comment