माय नगर वेब टीम
अहमदनगर : माजी खासदार दादा पाटील शेळके (वय 80) यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. गेली काही महिने ते आजारी होते. नगर नेवासा मतदारसंघातुन चार वेळा आमदार तर नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातुन दोनदा खासदार म्हणुन ते निवडून आले होते.
दादा पाटील शेळके यांनी नगर तालुका सहकारी साखर कारखाना उभारणीत मोठे योगदान दिले. तसेच कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष होते. नगर पंचायत समिती सभापती जि.प. सदस्य असा पदापासुन सुरूवात करत त्यांनी खासदारकीपर्यत मजल मारली. राजकारणात असुनही साधी राहणी हे त्यांचे वैशिष्ट्य होते. अनेक संस्था उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता.
दादा पाटील शेळके 1978 ते 1994 या दरम्यान चार वेळा आमदार होते. तसेच दोन वेळा खासदार झाले. तत्पूर्वी 1962 ते 1978 दरम्यान जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. याबरोबरच नगर तालुका पंचायत समितीचे उपसभापती, जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष, महाराष्ट्र रोजगार हमी योजना समितीचे सदस्य, नगर तालुका देखरेख संघाचे अध्यक्ष, नगर तालुका दूध संघाचे अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेचे सदस्य, नगर तालुका सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असे विविध पदे भुषविली. त्यांनी दुष्काळी पट्ट्यात म्हणजे नगर तालुक्यात सहकारी साखर कारखाना स्थापन केला. त्यांनी नगर तालुक्यात साधारण 30 महाविद्यालये स्थापन करून स्थानिक संस्थांकडे सुपूर्द केली. खासदार व आमदार असतानाही ते गरीबांच्या थेट झोपडीत जाऊन जेवण करीत. सर्वसामान्य राहणी व सर्वसामान्य शेतकऱ्यांत मिसळून राहणे, हे दादा पाटील यांचे वैशिष्ट्य होय. शनिवारी दुपारी खारे कर्जुने येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
Post a Comment