निलेश लंके यांच्याकडे एवढी आहे संपत्ती...



माय नगर वेब तीन
पारनेर :- राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच अपक्ष म्हणून नीलेश लंके यांनी दोन उमेदवारी अर्ज निवडक पदाधिकाऱ्यांसमवेत मंगळवारी निवडणूक अधिकारी सुधाकर भोसले यांच्याकडे दाखल केले. अर्जासोबत प्रतिज्ञापत्रात संपत्तीचे विवरण देण्यात आले असून यावरून स्वतःला फकीर म्हणणाऱ्या निलेश लंके यांच्याकडे किती संपत्ती आहे. हे स्पष्ट होत आहे. संपत्तीच्या विवरण पत्रावरून निलेश लंके यांचा खोटारडेपणा उघड झाला आहे.

निलेश लंके यांनी गेल्या महिन्यात आ.विजय औटी यांच्या विरोधात बोलताना ‘मी फकीर आहे, माझे बँकेत खाते ही नसल्याचे वक्तव्य केले होते, मात्र निवडणूक अर्ज भरल्यानंतर त्यांची खरी संपत्ती समोर आली आहे.

लंके यांनी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे ५८ लाख ५६ हजार ५२१ रुपयांची जंगम, तर १५ लाख ३५ हजार १५३ रुपयांची स्थावर मालमत्ता असून ३२ लाख २८ हजार ९८९ रुपयांचे कर्ज आहे. लंके यांच्याकडे ५० हजार रुपये रोख.

१३ हजार ९७७ रुपयांच्या ठेवी व शेअर्स, १७ लाख ३ हजार ६८८ रुपयांची बस, २६ लाख ७५ हजार ९३६ रूपयांची कार, १३ लाख २२ हजार २६० रुपयांची बस, ७ हजार १०० रुपयांची दुचाकी, ७६ हजार रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या आहेत.

त्यांच्या पत्नी जि. प. सदस्या राणी लंके यांच्याकडे ४० हजार रोख, ४ हजार ७३५ रुपयांच्या ठेवी, १ लाख १४ हजारांचे सोन्याचे दागिने आहेत. नीलेश यांच्याकडे १५ लाख ३५ हजारांची स्थावर मालमत्ता आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post