खासदार विखे माफी मागा..




माय नगर वेब टीम
अहमदनगर - खासदार सुजय विखे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात आपण महिला आयोगाकडे जाणार असल्याची माहिती अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी दिली आहे. विखे यांनी माफी मागावी अन्यथा मी महिला आयोगाकडे
याबाबत दाद मागेन असा इशारा सय्यद यांनी दिला आहे. अहमदनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

देखणा व्यक्ती आला तर त्याला पाहायला जायला पाहिजे असं विधान खा.विखे यांनी मला उद्देशून नगर तालुक्यातील एका सभेत केलं होतं. आता अभिनेत्री सय्यद यांनी विखे यांच्या या वादग्रस्त विधानावरुन सुजय विखे यांच्यावर टीका केली आहे. एका सुजान आणि सुसंस्कृत घरातून आलेल्या आणि स्वत; खासदार असणार्‍या व्यक्तीला असे विधान करणं शोभत नाही असं सय्यद यांनी म्हटलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post