' त्यांचा ' पाचपुते करणार






माय नगर वेब टीम
अहमदनगर  – राष्ट्रवादीने अकोलेचे मधुकरराव पिचड यांना मंत्रिपदांपासून ते प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत सर्वकाही दिले. तरी त्यांनी पक्ष सोडला. 2014 ला बबनराव पाचपुते यांनीही तसेच केले होते. त्यानंतर जे झाले त्याची पुनरावृत्ती करण्याची तयारी पक्षाने केली आहे. मुख्यमंत्र्यांची यात्रा अकोलेत झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अकोल्यात मोठे इनकमिंग होणार आहे. श्रीगोंदे पॅटर्न अकोल्यात राबविण्याची तयारी राष्ट्रवादीने केली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिली.



राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले व खा. अमोल कोल्हे यांची शिवस्वराज्य यात्रा व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या कर्जत-जामखेड दौर्‍या प्रसंगी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

फाळके म्हणाले, शिवस्वराज्य यात्रा 6 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट दरम्यान तीन टप्प्यात राज्यभर निघणार आहे. या यात्रेची सुरूवात शिवनेरी किल्ल्यावरून होईल तर समारोप रायगड येथे होईल. ही यात्रा मंगळवारी (ता. 6) सायंकाळी 6 वाजता निघोज (ता. पारनेर)मध्ये येईल. तेथे सायंकाळी 6 ते रात्री 9 या कालावधीत रॅली, रोड शो व सभा होईल. ही यात्रा नगर येथे मुक्कामी येईल. या यात्रेत खा. कोल्हे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी असतील.


पिचड विरोधक अकोल्यात संपर्कात
अकोले तालुक्यात डॉ. किरण लहामटे, सुनीता अशोक भांगरे, सतीश भांगरे आमच्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यानंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हे पक्ष प्रवेश होतील. पिचड जरी गेले असले तरी निष्ठावान कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत. जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांच्याकडे तात्पुरता अकोल्याचा कारभार देण्यात आला असून ते लवकरच कार्यकारिणी जाहीर करतील.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post