माय नगर वेब टीम
मुंबई -
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, त्या दृष्टीने शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा एक मेळावा पार पडला. दरम्यान, यावेळी असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. या मेळाव्याला शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी मार्गदर्शन केलं. याच वेळी परब यांनी आदित्य ठाकरे हे वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची त्यांनी घोषणा केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
या मेळाव्यादरम्यान, शिवसेनेचे वरळीतील विद्यमान आमदार सुनील शिंदे आणि सचिन अहिर हेदेखील उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे या दोघांची साथ लाभल्यास मोठ्या मताधिक्याने आदित्य ठाकरे हे विधानसभेवर निवडून जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी शिंदे यांची सचिन अहिर यांचा पराभव केला होता. परंतु अहिर यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीची ताकद कमी झाली असून शिवसेनेची ताकद वाढली आहे.

Post a Comment