गाव दत्तक घेण्याचा मानस : पुढील बैठक 15 रोजी
माय नगर वेब टीम
अहमदनगर - कोल्हापूर-सांगली यासारखे भागांमध्ये गेल्या अनेक दिवसापासून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील नागरिकांचे जीवनावश्यक वस्तूंवरही परिणाम झाला आहे. यासर्व पूरग्रस्त लोकांसाठी मदतीचा हात म्हणून नगर शहरातील गणेश मंडळ हे पुढे आले असून, यंदाच्या वर्षी गणपती उत्सव साध्या पद्धतीने साजरे केला जाणार असल्याचे नगर शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळाच्या बैठकीत ठरविण्यात आले. शहरातील मानाच्या गणपती मंडळासह विविध पदाधिकार्यांनी आपलं मत व्यक्त करताना चौकातील भंडारे व आरस यासारखे गोष्टी न करता आम्ही पुरग्रस्तांना मदत करणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. या बैठकीस विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी शहरप्रमुख संभाजी कदम म्हणाले की, गेल्या 15 दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुराने तेथील नागरिकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. तेथे झालेली हानी पुढील अनेक दिवस भरुन निघणार नाही. वास्तवक पाहता या ठिकाणच्या नागरिकांचे संसार उभे राहण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंबरोबरच, संसारोपयोगी वस्तूंचेही मदत करण्याचा मानस आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने भंडारा व आरस व त्याचबरोबर डीजे हेही लावणार नसल्याचे सांगून,मंडळ यावेळेस साध्या पद्धतीने गणेश मूर्तीची स्थापना करणार असल्याचे सांगून या सामाजिक कार्यात शहरातील सर्व मंडळानी सहभागी व्हावे व पुरग्रस्तांना उभे करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन श्री.कदम यांनी केले.
बाळासाहेब बोराटे म्हणाले, कोल्हापूर व सांगली येथे झालेली वित्तहानी ही मोठी आहे. यातून तेथील नागरिकांना उभे राहण्यासाठी जिल्ह्यातून मदतीचा ओघ पाठविण्याचा मानस आहे. तसेच मनपाच्यावतीने दरवर्षी गणेशोत्स स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. जर मंडळाच देखावे व कार्यक्रम सादर करणार नसतील तर ही स्पर्धा या वर्षीसाठी रद्द करुन तो निधी पुरग्रस्तांना देण्यात यावा, अशी मागणी केली.
नगरसेवक अविनाश तात्या घुले,दत्ता कावरे व माजी नगरसेवक विपुल शेठ शेटिया यांनीही आपल्या मंडळाच्यावतीने अनावश्यक खर्च टाळून ती सर्व रक्कम पूरग्रस्तांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी अनेक मंडळाच्या पदाधिकार्यांनीही या उपक्रमात आपण सहभागी होणार असल्याचे सांगितले. तसेच एखादी गाव दत्तक घेऊन त्या गावाचे पुनर्वसन करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. यावेळी नगर शहरातील छोटे-मोठे सर्व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते. तसेच 15 ऑगस्ट रोजी सायं. 7 वा. बुवाजी बुवा मंदिर, कौठीची तालिम, माळीवाडा येथे होणार्या बैठकीसाठी शहरातील मंडळांनी मोठ्या संख्येने उपस्थि रहावे, असे आवाहन केले.
यावेळी परेश लोखंडे, शिवाजी कदम, दिलदारसिंग बिर, अभिमन्यू जाधव, दत्ता गाडळकर, शंभु गिरवले, त्रिशुल उर्णे, सचिन गाडेकर, उमेश भागानगरे, ऋषीकेश चक्के, किरण शिंगी, ओंकार फुलसौंदर, सनी बहिरवाडे, गौरव बुगे, विनायक ताठे, बाबू कावरे, शुभम भापकर, दिपक थोरात, अनिकेत लोंढे, चेतन गाडळकर, अभिषेक खंदारे, श्रीकांत लगड, लंकेश हरबा आदी उपस्थित होतेे.
Post a Comment