कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार कोसळलं, येडियुरप्पा राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार




माय नगर वेब टीम
बंगळुरु - गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या कर्नाटकातील राजकीय नाट्याला पूर्णविराम मिळाला आहे. कर्नाटकातील कुमारस्वामी यांचं सरकार कोसळलं आहे. काँग्रेस-जेडीएस सरकार बहुमत चाचणीत अपयशी झाल्याने सरकार कोसळलं. बहुमत चाचणीत सरकारच्या बाजूने 99 तर विरोधात 105 मतं मिळाली.

थोड्याच वेळात कुमारस्वामी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांना सोपवतील. कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसचं सरकार कोसळल्याने भाजपचा सरकार स्थापनेचा मार्ग याठिकाणी मोकळा झाला आहे. भाजपच्या आमदारांनी व्हिक्टरी साईन दाखवत आपला आनंद साजरा केला आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

आज दिवसभर कर्नाटक विधानसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. विश्वासदर्शक ठरावापूर्वी विधानसभेत दीर्घ चर्चा पार पडली. विधानसभा अध्यक्षांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांना उभं त्यांची मोजणी केली. अधिकाऱ्यांनी आधी सत्ताधारी पक्षातील आमदारांची संख्या मोजली, त्यानंतर विरोधी पक्षातील आमदारांची संख्या मोजली. पहिल्यांना असं झालं आहे, आमदारांना उभं करुन त्यांची मोजणी केली.

काँग्रेस-जेडीएसचं सरकार कोसळल्याने थोड्याच वेळात येडियुरप्पा राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी जाणार आहेत. कर्नाटकातील राजकीय अस्थिरतेमुळे पुढील 2 दिवस कर्नाटकात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
काँग्रेस आणि जेडीएसच्या 16 आमदारांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिल्याने, कुमारस्वामी सरकार अल्पमतात आलं होतं. कुमारस्वामी सरकार पाडण्यासाठी आमदारांना भाजपने पैसे दिल्याचा आरोप काँग्रेस नेते सिद्धरमैया यांनी केला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post