
माय नगर वेब टीम
मुंबई - विधानसभेतल्या आमदारांपैकी मी सर्वात भ्रष्ट व नालायक आमदार म्हणून उभा आहे, अशी खंत सातत्याने होणार्या आरोपांना उत्तर देताना एकनाथ खडसेंनी व्यक्त केली आहे.
सभागृहात आरोप-प्रत्यारोप होत असतात. मी विरोधी पक्षनेता असताना पुराव्याशिवाय कधीही आरोप केले नव्हते. बिनबुडाचे आरोप केल्याने काय दु:ख होेते हे मी चांगलंच जाणतो, असे खडसेंनी विधानसभेत बोलताना सांगितले.
दाऊदच्या बायकोशी माझे बोलण्याचे थेट संबंध जोडले गेले. दाऊद सोडून तिला नाथाभाऊंशी का बोलावसे वाटले हे मला अजून काही कळलेच नाही. मात्र चौकशी अंती काहीच सिद्ध झाले नाही, त्यामुळे बरे वाटल्याचे खडसेंनी सांगितले
दरम्यान, एकनाथ खडसे सातत्याने पक्षावरची नाराजी आपल्या बोलण्यातून व्यक्त करत आहेत.
Post a Comment