
माय नगर वेेेब टीम
नवी दिल्ली - भारताचा धडाकेबाज फलंदाज अंबाती रायडू याने एकाएकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या घोषणेने चाहत्यांना जोरदार धक्का बसला आहे.
विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात त्याची निवड न झाल्याने तो कमालीचा नाराज होता. त्याने त्याची नाराजी बोलूनही दाखवली होती.
विश्वचषक स्पर्धेत शिखर धवन आणि विजय शंकर जखमी झाल्याने अंबाती रायडूला संधी मिळेल, असे अनेक जणांना वाटत होते. परंतू त्याला संधी मिळाली नाही. आयसीसीदेखील याने अवाक झाली होती.
Post a Comment