गृहकर्जे स्वस्त होणार ; आरटीजीएस, एनईएफटी शुल्क रद्द


माय नगर वेब टीम
 मुंबई- भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) पत धोरण आढावा जाहीर केला असून, त्या नुसार रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे गृहकर्जे स्वस्त होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नव्या दरानुसार रेपो दर ६.०० टक्क्यांहून ५. ७५ टक्क्यांवर आला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सहा सदस्यीय पतधोरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तथापि, समितीने रिझर्व्ह रेपो दरात कोणतीही कपात केलेली नाही.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मोठ्या ट्रान्झॅक्शनसाठी वापरण्यात येणाऱ्या रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट सिस्टम अर्थात आरटीजीएस फंड ट्रान्सफर आणि नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरसाठी (एनईएफटी) घेण्यात येणारे शुल्क रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे बँका देखील आपल्या ग्राहकांसाठी ट्रान्झॅक्शन शुल्क कमी करण्याची शक्यता आहे. डिजिटल पेमेंटला चालना देण्याच्या उद्देशाने आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post