सहा गडी राखून भारताची विजयी सलामी
माय नगर वेब टीम
world cup 2019 :
रोहित शर्माच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने वर्ल्डकप स्पर्धेची विजयानं सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेलं २२८ धावांचं आव्हान भारताने ६ गडी राखून गाठलं. आफ्रिकेचा वर्ल्डकप स्पर्धेतील हा सलग तिसरा पराभव ठरला. रोहित शर्मा भारतीय संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
रोहित शर्माची शतकी खेळी आणि युजवेंद्र चहलच्या तूफान गोलंदाजीमुळे (4/51) भारताने विश्वचषकात दमदार सुरुवात करत 228 धावांचं लक्ष्य पार केलं.
नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र दक्षिण आफ्रिकेला 50 षटकांत केवळ 227 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताने 48 षटकांत चार गडी गमावत हे आवाहन सहज पार केलं.
टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्माने या सामन्यात 128 चेंडूंमध्ये शतक साजरं केलं. रोहितचं वन डे कारकीर्दीतलं हे तेविसावं आणि विश्वचषकातलं दुसरं शतक ठरलं. या सामन्यात भारतीय विजयाच्या आशा या रोहितवरच केंद्रित झाल्या होत्या. रोहित 122 धावांवर नाबाद राहिला. रोहित आणि धोनी या जोडीने विजयासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले.

Post a Comment