सुप्रिया सुळेंना विरोधी पक्षनेते पद मिळणार ? दिल्लीत हालचालींना वेग




माय नगर वेब टीम

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले आहेत. राष्ट्रवादी हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत या भेटीत चर्चा होत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसंच राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना लोकसभेचं विरोधी पक्षनेते पदही मिळेल, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राष्ट्रवादी हा पक्षच काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास देशाच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळू शकते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्या इतपतही काँग्रेसला जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन केल्यास विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याएवढ्या जागा होऊ शकतील. असं झाल्यास सुप्रिया सुळे यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेते पदाची माळ पडू शकते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post