ब्रेकिंग : राष्ट्रवादी कॉंग्रेस होणार कॉंग्रेसमध्ये विलीन ?




माय नगर वेब टीम
दिल्ली - देशाच्या राजकारणातली सर्वात मोठी राजकीय बैठक दिल्लीमध्ये होताना दिसत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची मोठी बातमी सूत्रांकडून मिळाली आहे. शरद पवार आणि राहुल गांधी यांची दिल्ली येथे बैठक झाली. या बैठकीनंतर ही माहिती समोर येत आहे.मात्र अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

या लोकसभा निवडणुकीत भाजपने कॉंग्रेसचे अस्तित्व धोक्यात आणत विजय मिळवला आहे. या लाजिरवाण्या पराभवानंतर कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये जाण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासाठी कॉंग्रेसला बळकटी देण्यसाठी राष्ट्रवादी पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होणार का अशा चर्चांनी जोर पकडला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post