२३ जून रोजी मतदान : २४ जून रोजी मतमोजणी
माय नगर वेब टीम
अहमदनगर-
विद्यमान जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराजे गाढे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारागाव नांदूर या जिल्हा परिषद गटाची तर सोनई व कोरेगाव गणातून निवडून आलेल्या सदस्यांनी राजीनामे दिल्याने रिक्त झालेल्या सदस्य पदाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. ३ जून ते ८ जून या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार असून २३ जून रोजी मतदान आणि २४ जून रोजी मतमोजणी प्रक्रिया संपन्न होणार आहे.
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. नगर जिल्हा परिषदेतील बारागाव नांदूर या गटाची जागा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराजे गाढे यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झालेला असताना शिवाजीराजे गाढे यांचे दुर्दैवी निधन झाले.
तर नेवासे पंचायत समितीच्या सोनई गणातून सुनिता शंकरराव गडाख या विद्यमान सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या.तसेच कर्जत पंचायत समितीच्या कोरेगाव गणातून पुष्पा युवराज शेळके निवडून आल्या होत्या. मात्र या दोन्ही सदस्यांनी राजीनामे दिल्याने पंचायत समिती गणाच्या सोनई व कोरेगाव जागा रिक्त झाल्या. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या रिक्त झालेल्या जागांसाठी आयोगाने पोट निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज दाखल करणे - ३ ते ८ जून
उमेदवारी अर्ज छाननी - १० जून
वैध उमेदवार यादी - १० जून
अपील कालावधी - १३ जून
मतदान - २३ जून ( स.७:३० ते ५:३०)
मतमोजणी -२४ जून

Post a Comment