रस्ता लूट करणारी टोळी जेरबंद



तोफखाना पोलिसांची कारवाई : टोळीतील चौघांना 22 पर्यंत पोलीस कोठडी
माय नगर वेब टीम
अहमदनगर
नगर-कल्याण रोडवरील एमआयडीसी बायपासवर टेम्पोच्या मागून येऊन टेंम्पोला दुचाकी आडवी लावून चालकाला मारहाण करून लुटणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. तोफखाना पोलीसांनी ही कारवाई केली.
किरण रावसाहेब जरे (वय 33) याच्यासह आशुतोष भाऊराव शिंदे (वय-21, रा. कोळसगावी, ता. पाथर्डी) व प्रमोद रावसाहेब साठे (वय-19, गोधेगाव, ता.नेवासा ) असे चार आरोपींना पकडण्यात आले आहे. त्याना न्यायालयात हजर केले असता 22 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
नगर-कल्याण रोडवरील एमआयडीसी बायपासवर टेम्पोच्या मागून येऊन टेंम्पोला दुचाकी आडवी लावून त्याच्याकडील दोन तोळ्याची सोन्याची चैन, 12 हजार 500 रुपये, एटीएम कार्ड इतर कागदपत्र लुटून नेल्याची घटना 21 एप्रिल रोजी घडली होती. याप्रकरणी किसन महादेव देसाई (वय-30, सबलखेडा, ता.आष्टी) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस निरीक्षक मुलाणी यांना मिळालेल्या माहिती नुसार फौजदार मेढे, सोळंके, कर्मचारी दत्तात्रय जपे, नंदकुमार सांगळे, मंगेश खरमाळे, अविनाश वाघचौरे, शिरीष तरटे, यांच्या पथकाने कारवाई केली.
या टोळीकडून या परिसरात घडलेले रास्ता लुटीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पुढील तपास फौजदार मेढे करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post