आरबीआय च्या नवीन नियमांमुळे निम्मे एटीएम होणार बंद
नवी दिल्ली-
आज प्रत्येक जण क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करतो. एटीएम कार्डचा वापर बँकेतून पैसे काढण्यासाठी किंवा शिल्लक रक्कम जाणून घेण्यासाठी करतो. पण गेल्या काही दिवसांपासून देशात एटीएमची संख्या कमी होत आहे. आरबीआयने लागू केलेल्या काही नियमावलीमुळे देशातील निम्मे एटीएममध्ये बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियमात एटीएम मशीनबाबत काही नवे नियम व अटी लागू केल्या आहेत. या कारणामुळे सर्व बँकांना एटीएम मशीनमध्ये काही बदल करावे लागत आहे. हे बदल करण्यासाठी बँकेला आर्थिक भुर्दंडदेखील सहन करावा लागत असल्याने, काही बँकांनी एटीएम मशीन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Post a Comment