सबजेलपासून बेड्यासह पळालेल्या आरोपीला पकडले
माय नगर वेब टीम
अहमदनगर -
सबजेल मध्ये आरोपी जमा करण्यासाठी जात असतांना बेड्या असलेल्या आरोपीने पोलिसांना झटका देत सबजेल समोरच्या पटांगणातून पलायन केल्याची घटना आज घडली. पोलिसांनी पाठलाग करून आरोपीला पुन्हा बेड्या ठोकल्या. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
हकीगत अशी की, पो.हे.कॉ पोपट दशरथ कटारे नेम.एमआयडीसी पोलिस स्टेशन अहमदनगर हे आरोपी किरण उर्फ कुबड्या दशरथ पालवे, (वय २२ वर्ष रा.नागापूर), याला दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सबजेल मध्ये जमा करण्यासाठी जात असताना आरोपीने पोलिसांच्या हाताला झटका देत बेड्यासह पलायन केले.दरम्यान पोलिसानी आरोपीचा पाठलाग करत त्याचा पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करत मोठ्या शिताफीने पकडले. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment