मोदी सरकार जाईपर्यंत कपडे न घालण्याचा तरुणाचा निर्धार



नाशिक : 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये सभा पार पडली. या सभेदरम्यान एक तरुण चक्क अर्धनग्न अवस्थेत शरद पवारांना निवेदन देण्यासाठी स्टेजवर आला. भाजप सरकार राज्यातून आणि केंद्रातून जात नाही, तोपर्यंत आपण कपडे घालणार नसल्याचा निर्धार या तरुणाने केला आहे.


कृष्णा डोंगरे असं या आंदोलक तरुणाचं नाव आहे. कृष्णा मोदी सरकारचा निषेध म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून अर्धनग्न अवस्थेत फिरत आहे. आज कृष्णाने शरद पवारांना भेटून आपलं निवेदन त्यांना दिलं. शरद पवारांनीही तरुणाचं निवेदन स्वीकारत काळजी करु नको असं म्हटलं.


तरुणानं जमिनीच्या प्रश्नावरुन काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं. परंतु सरकारनं दडपशाही केल्याचा आरोप त्यानं केला आहे. त्यानंतर मार्च महिन्यात कृष्णाने आपले कपडे आणि चप्पल पंतप्रधान कार्यालयाला स्पीड पोस्टने पाठवले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post