जपानी भाषेचे ज्ञान असलेल्या भारतीयांना करिअरची उत्तम संधी -समृध्दी बोरा



नगर :
युताका जापनीज लँग्वेज स्कुल अ‍ॅण्ड सर्व्हिसेसच्या संचालिका समृध्दी बोरा यांनी शहरात आयोजित केलेल्या जपानी भाषा व संस्कृती कार्यशाळेला युवक-युवतींचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. या कार्यशाळेत जपान फाऊंडेशनचे हिरोआकी कोनीशी व हिरोकी ओझाकी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कोनीशी सेनसेई यांनी जपानमध्ये गेल्यानंतर आपली ओळख जपानी मानसाला कशी करुन द्यावी, व्यावसायिक व व्यापाराच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शन करुन जपानी भाषेबद्दल असलेल्या शंकांचे निरसन केले.

ओझाकी सेनसेई यांनी जपानी भाषेतील गीत उपस्थितांना शिकवले. समृध्दी बोरा यांच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले जपानी भाषा व संस्कृतीचे प्रकल्प सादर केले. जपानी भाषेतील नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांनी या नाटिकेचे कौतुक केले.

जपानमध्ये व्यापार, उद्योगधंदे व नोकरीच्या अनेक संधी असून, जपानी भाषेचे ज्ञान असलेल्या भारतीयांना करिअरसाठी तीथे उत्तम संधी आहे. कार्यशाळेचे हे दुसरे वर्ष असून, याला युवक-युवतींचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. भारतीयांना जपानी भाषेचे दर्जेदार शिक्षण देत असल्याबद्दल जपान येथील उपस्थित पाहुण्यांनी समृध्दी बोरा यांचे कौतुक केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी बचपन स्कुलचे पुष्पा गांधी, सागर गांधी व राखी गांधी यांचे विशेष सहकार्य लाभले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post