बाबुर्डी बेंद येथे खंडोबा यात्रेचा उत्साह; भाविक कावडी घेऊन जेजुरीकडे रवाना...



 बाबुर्डी बेंद येथे खंडोबा यात्रेचा उत्साह; भाविक कावडी घेऊन जेजुरीकडे रवाना...

अहिल्यानगर :  येथील बाबुर्डी बेंद (ता. जि. अहिल्यानगर)

येथे सालाबादप्रमाणे यंदाही खंडोबा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या उत्सवानिमित्त गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

यात्रेच्या पार्श्वभूमीवर जेजुरी ते बाबुर्डी बेंद अशी पारंपरिक कावड यात्रा सुरू आहे. भाविक कावडी घेऊन जेजुरीकडे रवाना झाले असून तेथून पवित्र पाणी आणून खंडोबाच्या चरणी अर्पण करण्यात येणार आहे. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू असून दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक यात सहभागी होतात.

कावड यात्रेदरम्यान भाविकांच्या “येलकोट येलकोट जय मल्हार” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आहे. युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला वर्गाचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे.

दरम्यान, यात्रा उत्सवासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर तयारी केली असून विविध धार्मिक कार्यक्रम, काठी मिरवणूक, जागरण गोंधळ, आर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. 

या यात्रेमुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून बाबुर्डी बेंद येथील खंडोबा यात्रेला यंदा मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post