Ahmednagar news : नाकाबंदीत 51 लाखांची रोकड पकडली



माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातील एका व्यापाऱ्याच्या वाहनातून ५१ लाख १६ हजाराची रक्कम नाकाबंदी दरम्यान पथकाने ताब्यात घेतली आहे. ही रक्कम कोणाची, कुठे चालली होती. चौकशीनंतर या रकमे संदर्भात उलगडा होणार आहे.


स्टीलचा व्यवसाय असलेल्या नगर जिल्ह्यातील व्यापाऱ्यावर पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये ही कारवाई करण्यात आली. बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान नगर-पुणे मार्गावर शिरूर मध्ये नाकाबंदी सुरू होती. पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे आणि त्यांच्या पथकाने या व्यापाऱ्याचे वाहन नाकाबंदी दरम्यान थांबवत वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये पथकाला ५१ लाख १६ हजाराची रोकड आढळून आली.


पथकाने वाहनात आढळलेली रोख रक्कम ताब्यात घेत याची माहिती निवडणूक आयोग आणि आयकर विभागाला दिली. त्यानंतर ही सर्व रक्कम आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post