आमदार लंके यांच्याबाबत भाजप आमदार शिंदे यांचे सूचक वक्तव्य; 'त्या' वक्तव्याची तुफान चर्चा



माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर – आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या व्यासपीठावर भाजपचे माजी मंत्री तथा आमदार राम शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके ‘,बीआरएस’चे घनश्याम शेलार, ‘काँग्रेस’चे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळुके, प्रा.मधुकर राळेभात, गहिनीनाथ शिरसाट, दीपक भोसले, करण ससाने,प्रियाताई कदम,छायाताई फिरोदिया, प्राचार्य पोपट तांबे, बाळासाहेब उगले, बंडू पाटील बोरुडे, रोहिदास कर्डिले, डॉ सुदर्शन पोटे यांच्यासह इतर पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली.

भाजपाचे माजी मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते महानाट्याचा शुभारंभ करण्यात आला.



महानाट्याचा शुभारंभ करताना आ.राम शिंदे यांनी आमदार नीलेश लंके यांचे कौतुक केले. ते म्हणाले, आमदार लंके यांच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी आहे. त्यांचे कोविड काळातील काम कौतुकास्पद आहे. या कामामुळे त्यांचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले. ज्याच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी असते. त्याला चिंता करण्याचे काही गरज नाही.

आमदार लंके यांच्या मनातील इच्छा साईबाबा पूर्ण करतील, असे सांगून भाजपाचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी आमदार लंके यांना शुभेच्छा दिल्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके म्हणाले, माझी कायम मदत असते, हे लंके यांना माहीत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post