आमदार निलेश लंके यांच्या प्रयत्नातून जल जीवन मिशन अंतर्गत २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर

 माय अहमदनगर वेब टीम 


नगर तालुका-पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांच्या विशेष प्रयत्नातून मतदार संघातील १४ गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

     पाणीपुरवठा योजनेसाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत २२ कोटी ७७ लक्ष ६१ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती युवा नेते अजय लामखडे यांनी दिली. या भरीव निधीमुळे १४ गावे व त्या परिसरातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने नागरीकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

     सांगवी सूर्या १५४.६७, घाणेगाव ६३.५८, हंगा १८९.८०, ढोकी १९९.७६, गुणोरे १९५.५५, गटेवाडी ८०.४२, शेरीकासरे १४७.९१, रेनवडी १२०.७७, तिखोल १९९.३६, पिंपळनेर १९९.५१, जातेगाव १९४.६४ म्हसे खुर्द १७०.४२, चास १९९.८०, निंबळक १६१.४२ रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या चौदा गावांनी आता पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

      आमदार निलेश लंके यांनी गावातील पाण्याची समस्या लक्षात घेऊन कायमस्वरूपी पाण्याच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी सुमारे २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे १४ गावातील पाण्याची समस्या मिटणार आहे. पाण्याची समस्या मिटणार असल्याने नागरिकांकडून आमदार निलेश लंके यांचे कौतुक करण्यात येत आहे.

______________________

 आमदार लंके यांचे कार्य कौतुकास्पद

 आमदार निलेश लंके यांनी निंबळक गावासाठी एक कोटी ६१ लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यांचा मतदारसंघातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार असतो. आमदार लंके यांनी मतदारसंघाबरोबर निंबळक गावच्या विकासासाठी भरीव निधी दिला आहे. त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

..... प्रियंका अजय लामखडे (सरपंच, निंबळक)


____________________________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post