नगर अग्नितांडव : जिल्हा शल्य चिकित्सकांसह सहा जणांवर कारवाई



अहमदनगर |  जिल्हा रुग्णालयाला (Ahmednagar District Civil Hospital) लागलेल्या आगीत तब्बल ११ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना घडताच राज्यात खळबळ उडाली.

पंतप्रधान मोदी यांच्यापासून ते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सर्वच नेत्यांनी या घटनेनंतर दु:ख व्यक्त केलं. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेची चौकशी करण्याचा आदेश दिला.

दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत माहिती दिली.

1. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा - निलंबित

2. डॉ.सुरेश ढाकणे- वैद्यकीय अधिकारी- निलंबित

3. डॉ. विशाखा शिंदे - वैद्यकीय अधिकारी- निलंबित

4. सपना पठारे- स्टाफ नर्स- निलंबित

5. आस्मा शेख -स्टाफ नर्स - सेवा समाप्त

6. चन्ना आनंत - स्टाफ नर्स- सेवा समाप्त

दरम्यान याप्रकरणाची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी सुरू झाली आहे. अतिदक्षता विभागाला आग कुठून आणि कशामुळे लागली याचा शोध घेणे महत्त्वाचे असल्याने सोमवारी सकाळी राज्याचे मुख्य विद्युत निरीक्षक दिनेश खोंडे यांनी पथकासह भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या पथकाने अतिदक्षता विभागाची बारकाईने पाहणी करून नोंदी घेतल्या आहेत.

तसेच पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. राज्याचे मुख्य विद्युत निरीक्षक खोंडे त्यांच्यासोबत शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, तोफखाना पोलीस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी उपस्थित होत्या. जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला शनिवारी सकाळी आग लागून 11 रूग्णांचा मृत्यू झाला. सहा रूग्णांवर उपचार सुरू आहेत. घटना घडल्यानंतर केंद्रीय मंत्री, राज्याचे मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकार्‍यांनी रूग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू झाला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post