शिर्डीचे साई मंदीर सुरू करण्यास सरकारला अडचण काय?



शिर्डी | देशांतर्गत तासंतासाचा रेल्वे (Railways), विमान (Aircraft) व बस (Bus) प्रवासासाठी नागरिकांना मुभा तसेच मॉलसह (Mall) इतर गर्दीची (Crowd) ठिकाणे सुरू करण्यास परवानगी देणार्‍या महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi government) साईमंदिर (Sai Temple) सुरू करण्यास अडचण काय? असा सवाल उपस्थित करत शिर्डी (Shirdi) पंचक्रोशीतील लाखो नागरिकांची होणारी उपासमार टाळण्यासाठी करोनाच्या आड न लपता सरकारने साई दर्शनापूर्वी (Sai Darshan) चोवीस तास अगोदरच आरटीपीसीआर (RTPCR) चाचणी निगेटिव्ह (Nigetive) असणार्‍या व लसीचे दोन डोस (Vaccination) घेतलेल्या भाविकांसाठी ऑनलाईन बुकिंग पद्धतीने दर्शन सुविधा सुरू करून भाविकांसाठी साईमंदिर खुले करावे, (Sai Temple Open Demand) अशी मागणी शिर्डी नगरपंचायतचे (Shirdi Nagarpanchayat) नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर (Mayor Shivajirao Gondkar) यांनी केली आहे.

नगराध्यक्ष गोंदकर (Mayor Shivajirao Gondkar) म्हणाले, प्रवासी साधने तसेच शॉपींग मॉलमध्ये नागरिक तासन्तास एकाच ठिकाणी असतात. या ठिकाणांना अनलॉक केले जाते. मात्र साईदर्शन घेऊन काही क्षणात बाहेर जाणार्‍या भक्तांसाठी शिर्डीचे साईमंदिर बंद (Shirdi Sai Temple Close) ठेवले जात आहे. नेमके यातून राज्य शासनाला काय साध्य करायचे आहे? शासनाने प्रवास, उद्योग व्यवसाय, मॉल यांना सुरू ठेवण्यासाठी जे नियम अटी व निकष ठेवले आहे त्याच नियमानुसार भाविकांसाठी साई मंदिर खुले का करीत नाही. देशांतर्गत इतर राज्यांत देवस्थान भक्तांसाठी खुले आहे तर शिर्डीसह (Shirdi) परिसरातील लाखो नागरिकांची उपासमार होत असताना शासन मंदिरं बंद ठेवून नेमके काय साध्य करू पाहत आहे.

देशातील इतर धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या तुलनेत शिर्डी (Shirdi) हे एकमेव असे धार्मिक तीर्थक्षेत्र आहे की साई मंदिरावर शेकडो गावांचे अर्थकारण अवलंबून आहे. शिर्डीतील (Shirdi) नागरिकांबरोबरच हॉटेलसह इतर व्यवसायिक बांधव मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. मालमत्ता कर तसेच वीज बिल भरणेही मुश्किल झाले आहे. शासन आपत्ती आल्यानंतर मदत करत असते परंतु शिर्डीतील (Shirdi) हॉटेल उद्योग पूर्णतः अडचणीत आला असून शासनाची कुठलीही मदत होत नाही. छोटा मोठा व्यवसायिक व रोजंदारीवर जगणारा नागरिक अडचणीत आला आहे. हजारोंंच्या संख्येत नागरिकांनी रोजगाराच्या शोधार्थ स्थलांतर केले आहे. इतका गंभीर परिणाम साई मंदिर बंद असल्याने परिसरावर झाला आहे.

शिर्डी नगरपंचायतने (Shirdi Nagarpanchayat) सुद्धा करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना मोठ्या प्रमाणात शहरात राबवलेल्या आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दररोज वेगवेगळ्या प्रभागात जाऊन नगरपालिकेचे पथक अँँटीजन तपासणी (Antigen Testing) करत आहे. त्यांनी लसीकरण ही मोठ्या प्रमाणात करून घेतले आहे. असे असतांना सरकारने आता साई मंदिर सुरू करणे गरजेचे असल्याचे नगराध्यक्ष गोंदकर (Mayor Shivajirao Gondkar) यांनी म्हटले आहे

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post