मराठा आरक्षण : केंद्राने अध्यादेश काढावा



माय वेब टीम 

अहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे स्वराज्य हे जसे अठरापगड जमातीमधील मावळ्यांचे होते, तसेच राजर्षी शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj) यांनी अनुसूचित जाती (SC) , जमाती (Tribes), ओबीसी (OBC) व मराठा समाज (Maratha society) असे मिळून 50 टक्के आरक्षण दिले होते. परंतु कालांतराने केंद्र सरकारने (Central Government) नेमलेल्या काही कमिट्यांच्या अहवालामुळे मराठा आरक्षण (Maratha Reservation) गेले. आरक्षण ही कायदेशीर प्रक्रिया आहे. मात्र महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) व भाजप (BJP) यांच्यामध्ये चाललेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे समाजात गैरसमज होऊन अपप्रकार होऊ नयेत, यासाठी मी हा संवाद दौरा काढला आहे, असे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजीराजे (MP Chhatrapati Sambhaji Raje) यांनी केले.मराठा आरक्षणासाठी आता केंद्र सरकारने अध्यादेश काढणे आणि नंतर त्याचा कायदा करून घेणे हा एकमेव पर्याय राहिला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षण आंदोलनाच्या (Maratha Reservation Movement) पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाची सद्यस्थिती, सारथी या संस्थेची सद्यस्थिती, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या विविध योजना, अशा विविध विषयांवर प्रबोधन करण्यासाठी खासदार संभाजीराजे हे जामखेड (MP Sambhaji Raje jamkhed) येथे आले होते. यावेळी नगरपरिषद समोरील प्रांगणात पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांनी जनतेशी संवाद साधला. याप्रसंगी विविध पक्षांच्या वतीने संभाजीराजे यांचे स्वागत करण्यात आले. भाजपच्यावतीने माजी मंत्री प्रा. राम शिंदे (Ram Shinde), राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ज्येष्ठ नेते प्रा.मधुकर राळेभात (NCp Madhukar Ralebhat) , राजेंद्र कोठारी, दत्तात्रय वारे, काँग्रेसचे राहुल उगले (Congress Rahul ugale), शिवसेनेचे संजय काशीद (Shivsena Sanjay Kashid), प्रहार संघटनेचे सचिन उगले (Prahar Sachin Ugale) , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंगेश आजबे, मनसेच्या वतीने प्रदीप टापरे आदींनी खासदार संभाजीराजे यांचे स्वागत केले. जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संभाजीराजे यांना सन्मानपत्र व जामखेड तालुक्यातील शेतकर्‍यांच्या वतीने खरीप हंगामात पिकणार्‍या तूर, उडीद व सोयाबीन या धान्यांचे सॅम्पल देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. येथील निवारा बालगृहातील विद्यार्थ्यांसोबत खा. संभाजीराजे यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. केंद्राने अध्यादेश काढावा. (Center should issue an ordinance)

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आता केंद्र सरकारने अध्यादेश (Central Government) काढणे आणि नंतर त्याचा कायदा करून घेणे हा एकमेव पर्याय राहिला आहे. मात्र, तोपर्यंत राज्य सरकारने (State Government) या प्रक्रियेला मदत करताना जे आपल्या हातात आहे, ते मराठा समाजाला द्यावे. या लढ्यातून मला स्वत:ला काहीही साध्य करायचे नाही. राज्यातील 70 टक्के मराठा समाज गरीब आहे, त्यांच्यासाठी आपला हा लढा सुरू आहे, असेही खा. संभाजीराजे (Mp Sambhaji Raje) यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post