‘या’ ५ पदार्थांचा करा डाएटमध्ये आवर्जून समावेश, ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी भासणार नाही डॉक्टरांची गरज!

 



माय अहमदनगर वेब टीम

जर सतत वाढणारा किंवा कमी होणारा ब्लड प्रेशर तुमच्यासाठी डोकेदुखी झाली असेल किंवा सर्व काही करुनही तो नियंत्रणात राहत नसेल तर आज आम्ही तुम्हाला अशा पाच पदार्थांची माहिती देणार आहोत ज्याचा डाएटमध्ये समावेश करण्यासाठी ना तुम्हाला कोणत्या डॉक्टरच्या सल्ल्याची आवश्यकता आहे, याचं सेवन केल्यावर ना तुम्हाला एक्सरसाईज  करावी लागेल, ना तुम्हाला सतत दवाखान्याच्या पाय-या झिजवाव्या लागतील. 

हल्ली सर्वांनाच ब्लड प्रेशरची सर्व माहिती चांगल्या पद्धतीने ज्ञात आहे. हाई ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाब ही एक अशी समस्या आहे की आपल्या चुकीच्या लाईफस्टाईल आणि खानपानाच्या सवयींमुळे जडू शकते. पण योग्य आहार घेऊन या आजारावर नियंत्रण मिळवणं सहज शक्य आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? जास्त नाही अगदी हे ५ पदार्थही तुमची समस्या सहज दूर करु शकतील. जाणून घेऊया इत्यंभूत माहीती!

बदाम

कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, नायसिन, ‘ब’ जीवनसत्त्व, तंतूमय व पिष्टमय पदार्थ, खनिज, प्रथिने, बदामात असतात. बदाम ओमेगा फॅटी ३ अ‍ॅसिडने परिपूर्ण पदार्थ असतो. यासोबतच बदाम पोटॅशियमचा देखील एक उत्तम स्त्रोत आहे. बदामाचे सेवन केल्याने ह्रदय मजबूत बनवण्या सोबतच ह्रदयाशी निगडीत अनेक आजार बरे करण्यास देखील मदत होते. बदामाच्या सालींमधील काही घटकांमुळे त्याचे पचन होणे कठीण होते. म्हणूनच बदाम रात्रभर भिजत ठेवावेत. यामुळे बाहेरील आवरण मऊ होऊन शरीराला अधिकाधिक पोषण मिळण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसांत रात्री भिजवलेले बदाम सकाळी उठून खाणं खूपच लाभदायक मानलं जातं. तसंच तुम्ही हिवाळ्यात रॉ बदामांचं सेवन करु शकता. बदामातील ‘अल्फा टेकोफेरॉल्स’ रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी बदाम खाल्ल्यास नैसर्गिकरित्या रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

केळी

केळ हे असं एक फळ आहे जे १२ ही महिने अगदी सहज कुठेही कधीही उपलब्ध होतं आणि या फळाचं सेवन अगदी सहजरित्या करता येतं. केळ्यांमध्ये पोटॅशियमची मात्रा अधिक असते. केळ्यातील पोटॅशियम सोडियमच्या नकारात्मक प्रभावास दूर करण्यास मदत करतात. पोटॅशियम एका वासोडिलेटरच्या रुपात काम करते. जे की शरीरातील अतिरिक्त सोडियमला मुत्रावाटे बाहेर फेकण्याचं काम करतं. केळ्यांमध्ये फायबर आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे उच्च रक्तदाब असणा-या रूग्णांना चांगल्या आरोग्यासाठी केळी खाण्याचा सल्ला देतात. त्यासोबतच केळीमध्ये सोडियम सुद्धा कमी प्रमाणात असतं. हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांना आहारातून सोडियमचा सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो.

पालक

ब-याच जणांना पालकची भाजी अजिबात आवडत नाही पण तुम्हाला माहित आहे का? पालक पोटॅशियमने परिपूर्ण असते. ही भाजी चवीला स्वादिष्ट नसली तरी आरोग्यासाठी खूपच लाभदायक असते. ह्रदयाला आवश्यक असणा-या फोलेट आणि मॅग्नेशियम या पोषक तत्वांच्या पूर्ततेसाठी पालक हा एक चांगला स्त्रोत आहे. जर तुम्हाला पालकची भाजी आवडत नसेल तर तुम्ही पालक स्मूदी, सॅलेड, सूप, पालक-पनीरची भाजी इत्यादी मध्ये वापरु शकता.

दही

एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार, लो फॅट असलेल्या दह्याचं प्रत्येक आठवड्यात दोन वेळा सेवन करणं उच्च रक्तदाब असणा-या रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त असतं. तुम्ही दह्याचे इतर पदार्थही खाऊ शकता. दह्यामध्ये पोटॅशिअम आणि कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. दिवसातून दोन वेळा दही आहारातून घ्या ज्यामुळे तुमचा उच्च रक्तदाबाचा त्रास नक्कीच कमी होऊ शकेल.

बीट

कंदमुळांमध्ये आढळणारं बीट हे एक असं फळ आहे जे भरपूर पोषक तत्वांनी भरलेलं असून निरोगी व सुदृढ ह्रदयासाठी देखी उपयुक्त मानलं जाते. कारण बीट मध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियमची मात्रा आढळते. तुम्हाला माहित आहे का? प्रत्येक १०० ग्रॅम बीटामध्ये जवळ जवळ ३२५ मिलिग्रॅम पोटॅशियमची मात्रा असते. यासोबतत बीट फायबर, फोलेट (व्हिटॅमिन बी९), मॅग्नीज, आयरन आणि व्हिटॅमिन सी ने परिपूर्ण असलेले फळ आहे. जर तुम्ही दररोज बीटाचा १ ग्लास ज्यूस प्यायला तर काहीच दिवसांत तुम्हाला उच्च रक्तदाबाच्या समस्येत फरक दिसून येईल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post