..तर महापालिकेत आंदोलन करणार; यांनी दिला इशारा

 


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून, मृत्यूचे प्रमाण देखील जास्त आहे. अमरधाममध्ये होणार्‍या अंत्यसंस्काराची संख्या आणि मृत झालेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता खूप मोठी तफावत आढळल्याने प्रशासन खरी संख्या का लपवते? असा प्रश्न आहे. येत्या दोन दिवसांत मनपाने कोरोना मृतांची खरी संख्या न दिल्यास नागरिक, नगरसेवकांसह ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक निखिल वारे यांनी दिला आहे.

अमरधाममधील कोरोनाग्रस्त मृतांवर झालेल्या अंत्यसंस्काराची यादी बोरा ट्रस्टकउून घेतली. यात 456 जणांवर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद होती. तर प्रशासनाकडून केवळ 300 रुग्ण दगावल्याची माहिती दिली गेली. यामध्ये तफावत आढळल्याने प्रशासन खरी संख्या लपवते का? अशी शंका आल्याने मनपाकडे पाठपुरावा केला. आरोग्यविभागाकडे चौकशी केली. आयुक्त, आरोग्याधिकार्‍यांकडून काहीही माहिती दिली जात नाही. खरी माहिती व सत्य लपवण्याचा प्रयत्न होतो, हे यावरुन स्पष्ट दिसते.

मनपाने दोन दिवसात सत्य जाहीर न केल्यास, मृतांचा खरा आकडा न सांगितल्यास नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, बाळासाहेब पवार यांच्यासह नागरिक मनपामध्ये ठिय्या आंदोलन करतील, असे निखिल वारे यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post