सारडा महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कौतुकास्पद - आमदार संग्राम जगताप


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर– आमदार संग्राम जगताप यांनी हिंदसेवा मंडळाच्या पेमराज सारडा महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. महाविद्यालयात नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतींची त्यांनी पाहणी केली. तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या अद्यावत बायोलॉजी प्रयोगशाळेलाही भेट दिली. तेथील सोयी सुविधा आणि अद्यावत उपकरणांची माहिती घेतली. हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक, माजी मानद सचिव सुनिल रामदासी, दादा चौधरी शाळेचे चेअरमन सुमतीलाल कोठारी यांनी आ. संग्राम जगताप यांचे स्वागत करून सत्कार केला.

      यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. शिरिष मोडक यांनी महाविद्यालयाच्या सुरू असणा-या विविध कोर्सेस आणि शैक्षणिक कामकाजाची माहिती आ. जगताप यांना दिली. सुनील रामदासी यांनी महाविद्यालय करत असलेल्या प्रगतीची माहिती दिली. मार्च-२०२० मध्ये झालेल्या १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये पेमराज सारडा कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल उत्कृष्ट लागला आहे. यात सायन्स विभागाचे २२ विद्यार्थी व  कॉमर्सचे ३ विद्यार्थी गणित  विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून उत्तीर्ण झालेत. त्याचप्रमाणे  कॉमर्स चे ०२ विद्यार्थी अकौंटन्सी या

विषयमाध्ये १०० पैकी १०० गुण मिळवून उत्तीर्ण झाले असल्याची माहिती दिली.


सुमतीलाल कोठारी यांनी महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतीगृहामध्ये झालेल्या अतिक्रमणाबाबत माहिती देऊन महाविद्यालयास येणा-या अडीअडचणी तातडीने सोडविण्याची विनंती केली.  महाविद्यालयाच्या प्रवेशाच्या वेळी आणि महाविद्यालय सुरू असतांना बाहेरील मुलांचा होणारा उपद्रव थांबवण्यासाठी सहकार्य करण्यची मागणी केली.


यावेळी आ. संग्राम जगताप म्हणाले, नगरमध्ये नावाजलेल्या पेमराज सारडा महाविद्यालयाने १२ वी च्या परिक्षेत  सर्व विभागात उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम राखत महाविद्यालयाने विद्यार्थांना घडवण्याचे चांगले काम केले आहे. पेमराज सारडा महाविद्यालय करत असलेली प्रगती कौतुकास्पद आहे. आशा चांगले काम करणाऱ्या पेमराज सारडा महाविद्यालयाला सर्वोतोपरी सहकार्य करू. महाविद्यालयाला भेडसावत असलेल्या समस्या प्राधान्याने सोडवू. मुलांच्या वसतीगृहामध्ये झालेल्या अतिक्रमणाची समस्या तातडीने लक्ष घालून प्रश्न मार्गी लाऊ. तसेच त्रास देणाऱ्या बाहेरील मुलांचाही बंदोबस्त करू, असे आश्वासन दिले. उत्कृष्ट निकालाची परंपरा याही वर्षी कायम ठेवल्याबद्दल हिंद सेवा मंडळाच्या पदाधिका-यांचे, तसेच प्राचार्य आणि प्राध्यपकांचे कौतुक केले.

      यावेळी माजी नगरसेवक आरिफ शेख, उद्दोजक वसिम हुंडेकरी, सुरेश बनसोडे आदि उपस्थित होते

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post