मनसेनंतर भाजपाच्या या नेत्यांने घेतली इंदोरीकर महाराजांची भेट



माय अहमदनगर वेब टीम
संगमनेर - इंदोरीकर महाराजांनी वारकरी संप्रदायाची पताका खेड्यापाड्यात पोहचवली. त्यांनी आपल्या कीर्तनात ग्रंथाच्या अधारे वक्तव्य केलं. या प्रकरणी इंदोरीकर महाराजांनी माफी मागितल्यानंतर हा विषय संपायला हवा होता. मात्र काही मुठभर लोकांनी कायद्याची पळवाट शोधत त्यांच्याविरोधात न्यायालयात फिर्याद दाखल केली.

महाराष्ट्रातील अध्यात्मातील सर्व मंडळी महाराजांच्या पाठीशी आहे, शिवसेना हिंदुत्ववादी होती. या चार-सहा महिन्यात शिवसेनेचे हिंदूत्व कुठे दिसते, असा सवाल भाजपच्या अध्यात्मिक सेलचे सहसंयोजक तुषार भोसले यांनी केला आहे.

समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांची मनसे पाठोपाठ आता भाजप नेत्यांनी भेट घेतली आहे. काल सकाळी श्री. भोसले यांनी इंदोरीकर महाराज यांच्या ओझर येथील निवासस्थानी भेट घेत चर्चा केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेवर सडकून टिका केली.

मुख्यमंत्री उद्वव ठाकरे हे शरद पवार यांना सोडून इतर कुणालाही भेटायलाही तयार होत नाहीत. त्यामुळे आमच्या अडचणी राज्यपालांकडे मांडल्या आहेत. पुनश्च हरिओमच्या नावाखाली दारुच्या दुकानांसह सगळेच उद्योग सुरु केले. हरीला मात्र लॉक करुन ठेवलं आहे, अशी टीका आचार्य तुषार भोसले यांनी केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post