हा परिसरही कन्टेन्मेंट झोन घोषित


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- गेल्या आठवडाभरापासून नगर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बुधवारी (दि.1) दिवसभरात 21 रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे. शहरात सध्या चार कन्टेन्मेंट झोन असून, आता पाईपलाईन रोडवरील पद्मानगर भागही कन्टेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे. दि.14 जुलैपर्यंत हा कन्टेन्मेंट झोन राहणार आहे.


(छाया – विजय मते)

या भागात नव्याने 5 रुग्ण आढळल्यामुळे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्यासह मनपा अधिकारी व नगरसेवकांनी परिसराची पाहणी करून उपाययोजनांच्या सूचना दिल्या. बुधवारी जिल्ह्यात तब्बल 35 रुग्णांची नव्याने नोंद झाली. यात शहरामध्ये सिध्दार्थनगर 1, सुडके मळा 1, पद्मानगर 5, तोफखाना 10, ढवणवस्ती 2, केडगाव 2 अशा 21 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील बाधित रुग्णांची संख्या 184 वर पोहचली आहे. तर 104 रुग्णांवर सध्या उपचार सुरू असल्याचे नोडल अधिकारी डॉ. सतिश राजूरकर यांनी सांगितले. तोफखाना परिसरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस दिवस वाढत आहे. या भागात आत्तापर्यंत 52 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे या भागातील परिस्थिती गंभीर झाली आहे. शहरात तोफखाना, सिध्दार्थनगर, नालेगाव व आडतेबाजार असे चार कन्टेन्मेंट झोन आहेत. आता पद्मानगर येथे रुग्णांची संख्या वाढल्यामुळे हा भागही कन्टेन्मेंट झोन झाला आहे. 14 जुलैपर्यंत या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. आयुक्त मायकलवार, शहर अभियंता सुरेश इथापे, नोडल अधिकारी डॉ. राजूरकर, नगरसेवक सुनील त्रिंबके, विनीत पाऊलबुधे, निखिल वारे, बाळासाहेब पवार यांनी या परिसराची पाहणी केली. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने या भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी, सर्व्हे सुरु करण्यात आला आहे. यावेळी प्रत्येक घरात जाऊन नागरिकांची तपासणी करून कोरोनाची लक्षणे दिसून आलेल्या व्यक्तींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता आता कोरोनाच्या सोबत जगून लढायचे आहे. स्वतः स्वतःचे रक्षक होऊन कोरोनावर मात करण्यासाठी मास्क वापरून सुरक्षित अंतर ठेवून काळजी घ्यावी असे आवाहन निखिल वारे यांनी केले.


पद्मानगरचा कन्टेन्मेंट झोन

जुना पिंपळगाव रोड, साई एन्क्लेव्हमधील मोबाईल शॉपी, पाईपलाईन हडकोमधील अंतर्गत रस्ता, जय सिताराम सुपर मार्केट, नूतन मराठी शाळा, गिरीधन अपार्टमेंट शेजारी व्यवहारे यांचे घर, पद्मानगरमधील खुल्या जागेची उत्तर हद्द, सौंदर्या क्रिएशन ते शाओमी मोबाईल शॉपी.

बफर झोनचा परिसर

जुना पिंपळगाव रस्त्याच्या पूर्व बाजूकडील वसाहती, जय तुळजाभवानीनगर, ज्ञानेश्वरनगर, दत्तनगर, एकवीरा चौक, पाईपलाईन हडको वसाहतीचा दक्षिण भाग, पाईपलाईन रोड, यशोदानगर, यशोदानगरच्या उत्तरेकडील खुली जागा, गावडे मळा, शिवचिदंबर मंदिर, साई इंग्लिश मीडिअम स्कूल ते तुळजा भवानी मंदिर.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post